प्रतिनिधी / कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री चिमासाहेब जगदाळे सोशल फाऊंडेशन संचलित कोविड सेंटरला जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी बोलताना श्री देसाई म्हणाले या परिसरात एका चांगल्या सेंटरची गरज होती हे ओळखून एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जगदाळे फाऊंडेशनने ही चांगले पाऊल उचलले असून येथे असणार्या प्रशिक्षित डॉक्टर मुळे सर्वसामान्य रुग्णांना मापक दरात चांगली सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल गौरव उद्गार काढले.
यावेळी श्री चिमासाहेब जगदाळे फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजीराव जगदाळे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ या सेंटरचे प्रमुख डॉक्टर संजीव वायदंडे व राजश्री वायदंडे त्याचबरोबर मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य कार्यकारणी सदस्य सागर धनवडे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनंत धनवडे मधुकर गवंडी मोहन काळे तसेच अन्य डॉक्टर पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









