जर चिप्स खाल्यावर त्याचे रॅपर फेकत असल्यास एक व्हिडिओ तुम्हाला नवा विचार देणार आहे. एका महिलेने अत्यंत सृजनात्मक काम केले आहे. तिने चिप्सच्या रिकाम्या पाकिटांना कचरापेटीत फेकण्याऐवजी त्यांना सोबत जोडून चमकणारी साडी तयार केली आहे.
पोटॅटो चिप्सच्या रॅपरद्वारे तयार साडी परिधना करून इन्स्टाग्रामच्या जगतात एंट्री मारताच हे प्रकरण व्हायरल झाले आहे. लोक याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. तर काही जणांना हे मजेशीर तर काहींना क्रिएटिव्ह वाटत आहे.

या छोटय़ा व्हिडिओच्या प्रारंभी महिला हातात पोटॅटो चिप्सचे पाकिट घेऊन असल्याचे दिसते. त्यानंतर पोटॅटो चिप्सच्या रिकाम्या रॅपरद्वारे तयार करण्यात आलेली साडी परिधान करून समोर येते. महिलेची क्रिएटिव्हीटी पाहून लोक दंग होत आहेत.
चिप्सच्या रिकाम्या रॅपरद्वारे साडी तयार करण्याचे हे अद्भूत कौशल्य इन्स्टाग्राम हँडल BeBadass.in वरून शेअर करण्यात आले आहे. तिने कॅप्शनमध्ये ‘ब्ल्यू लेज आणि साडीसाठी प्रेम’ असे लिहिले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 5 हजारांहून अधिक लाइक्स आणि 1 लाख 40 हजार ह्यूज मिळाले आहेत. युजर्सनी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका व्यक्तीने थट्टेच्या सुरात साडी असावी तर अशी असे म्हटले आहे. तर दुसऱया युजरने आम्ही सर्व जण एका स्नॅकप्रमाणे दिसू इच्छितो असे नमूद केले आहे.









