प्रतिनिधी / चिपळूण
जिह्यात देशी-विदेशी दारु विक्रीस बंदी असतानाही शहरातील पागनाक्यावरील टपरीवर देशी- विदेशी दारुची विकी होत. असल्याची कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी शुकवारी रात्री 8.15 वाजता धाड टाकली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून त्याच्याकडून 7 हजार 742 रुपयाची देशी-विदेशी दारु जप्त केली आहे.
कमलाकर भुवड (चिपळूण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भुवड हा काही दिवसांपासून शहरातील पागनाका येथे असलेल्या टपरीमध्ये देशी-विदेशी दारुची छुप्या पध्दतीने व्रिकी करीत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक समेद बेग, पोलीस नाईक संतोष शिंदे, महिला पोलीस आदिती जाधव, आशिष भालेकर आदींच्या पथकाने या टपरीवर धाड टाकली. यावेळी 7 हजार 742 रुपयांची देशी-विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी भुवड यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बेग करीत आहेत.
Previous Articleभात पिकाला हेक्टरी 25 हजार नुकसान भरपाईची मागणी
Next Article ऍड. बापूसाहेब परुळेकर यांना ‘दीपस्तंभ’ पुरस्कार









