चिपळूण / प्रतिनिधी
बनावट चावीचा वापर करुन लॉजमध्ये राहण्यासाठी आलेल्या एकाने 50 हजार 200 रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी शहरातील आदर्श निवास लॉजमध्ये उघडकीस आली. यापकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशिकांत गोविंद चिकले (66, गिरगाव-मुंबई) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिकले हे बिल्डरकडून रुम खरेदी करणार होते व त्यासाठी त्यांनी बिल्डरला पैसे देण्यासाठी 50 हजार रुपये आणले होते. हे पैसे त्यांनी ते राहण्यासाठी आलेल्या शहरातील चिंचनाका येथील आदर्श निवास लॉजच्या जनरल रुममध्ये ठेवले होते. शनिवारी रात्री 8 ते रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बनावट चावीचा वापर करुन 50 हजार 200 रुपये अज्ञाताने चोरुन नेले. हा पकार चिकले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तकार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस मोहिते करीत आहेत.









