प्रतिनिधी/ चिपळूण
गॅसच्या दरवाढीमुळे गृहिणी त्रस्त झाल्या असून शनिवारी राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने केंद्र सरकारविरोधात तहसील कार्यालयासमोर शेणाच्या गोवऱयावर स्वयंपाक आंदोलन केले. यानंतर नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याकडे दरवाढ कमी करण्यासाठीचे निवेदन सादर केले.
या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, जिल्हा कार्यकारिणी सदस्या सीमा चाळके, युवती जिल्हा सचिव प्रणिता घाडगे, नगरसेविका फिरोजा मोडक, पंचायत समिती सदस्या रिया कांबळे, छाया पवार, अनिता पवार, उषा पवार, दीपाली शिंदे, सारिका नलावडे, सांगता चव्हाण, स्वाती चौगुले, ताराबाई पवार, सरिता पवार, सुमन नलावडे आदी सहभागी झाल्या होत्या.









