कळंबट-साडेवाडी ठिकाणची घटना
चिपळूण
दुचाकी थांबवून शिवीगाळीसह मारहाण करुन बेकायदा जमाव केल्याची घटना गेल्या महिन्यात कळंबट-साडेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकांत 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण विश्राम कोकमकर, श्रेया प्रफुल्ल कोकमकर, सावित्री लक्ष्मण कोकमकर, अशा संतोष अवेरे, दत्ताराम विश्राम कोकमकर, ओंकार दत्ताराम कोकमकर, प्रफुल्ल लक्ष्मण कोकमकर, रामचंद्र विश्राम कोकमकर, किरण रामचंद्र कोकमकर, अंकुश रामचंद्र कोकमकर, शंकर विश्राम कोकमकर, संतोष कांबळे, भागिरथी रामचंद्र कोकमकर, दर्शना कृष्णा कोकमकर, आंनदी शंकर कोकमकर, तृप्ती दत्ताराम कोकमकर, संगिता संतोष कांबळे, आकांक्षा दत्ताराम कोकमकर, कृष्णा सखाराम घाणेकर, इंदिरा तानाजी कोकमकर, भिमा कृष्णा वणगे, (कळंबट-सडेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद फिर्याद रमेश हिरु कोकमकर (38, कळंबट-साडेवाडी) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जून रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कळंबट-सडेवाडी परिसरात रमेश कोकमकर हे आपला चुलतभाऊ परेश कोकमकर यांना दुचाकीवरून घेऊन कळंबट-सुतारवाडीकडे जात असताना लक्ष्मण कोकमकर यांनी त्यांना थांबवून शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी मंगेश कोकमकर यांने रमेश कोकमकर यांना काय झाले अशी विचारणा केली. यावर लक्ष्मण कोकमकर यांना त्यांनी हाताने मारले. तसेच वरील सर्वांनी कोरोनामुळे मनाई आदेश असतानादेखील त्याचे उल्लंघन करुन गैरकायदा जमाव जमवून रमेश कोकमकर तसेच मंगेश कोकमकर यांना मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. यात मंगेश कोकमकर यांना दुखापतप झाली आहे. याप्रकरणी रमेश कोकमकर यांच्या तक्रारीनुसार 21जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे









