प्रतिनिधी / चिपळूण
शहरातील गोवळकोट रोडवरील एकाच्या बँक खात्यातून पेटीएमद्वारे 78 हजार रूपयांची रक्कम काढून ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. यापकरणी संबधिताने दिलेल्या तकारीनुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फारूख अब्बास कोळथरकर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय या बँकेत खाती आहेत. या खात्यातून 1 जुलै ते 8 ऑक्टोबर दरम्यान अज्ञाताने पेटीएमद्वारे सुमारे 78 हजार रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याची तकार दिली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.
Previous Articleसौराष्ट्र-कच्छ येथे 6 तासांमध्ये 10 वेळा जाणवले भूकंपाचे धक्के
Next Article कुलुभूषण यांच्या शिक्षेची समीक्षा करणार पाक









