प्रतिनिधी / चिपळूण
गेल्या आठवडाभरात अतिवृष्टी तसेच पुरामुळे तालुक्यात मोठ्याप्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे स्थळपाहणी करून संयुक्त पंचनामे करण्याच्यादृष्टीने तहसीलदार जयराज सूर्यवंशी तालुक्यातील 167 गावांसाठी 163 कर्मचारी नियुक्त केले आहेत. पंचनाम्याचे काम सुरू झाले असून आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
गेला आठवडाभर होत असलेल्या अतिवृष्टी व पुरांमुळे मोठ्याप्रमाणात शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाले तुडूंब भरून वाहू लागल्याने कापणीला आलेले भातपीक आडवे झाले. काही गावांत कापणी करून शेतात ठेवण्यात आलेले पीक पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेले. वर्षभर मेहनत करून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहे. असे असतानाच शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल खात्याला दिले आहेत. यामध्ये 33 टक्क्यांपेक्षा आ†धक नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱयांना मदत दिली जाणार आहे.
Previous Articleअतिवृष्टीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत : पालकमंत्री शंकरराव गडाख
Next Article अपूर्वा नेमळेकरचे पुनरागमन









