चिपळूण
भरधाव वेगात असलेल्या चारचाकीने दुसऱया चारचाकीस समोरासमोर धडक दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या प्रकरणी एका चारचाकी स्वारावर चिपळूण पोलीस स्थानकात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवराम हिमल पवार (23, कळंबस्ते-चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद अक्षय धनंयज बागुल यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बागुल हे शुप्रवारी रात्री 10.30 वाजता सुझुकी कार घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरील शहरातील बहाद्दूरेशख नाका या ठिकाणी आले असता समोरुन येणाऱया भरधाव कारने समोरासमोर धडक दिली. मात्र या अपघातानंतर पवार हा त्या ठिकाणी न थांबता निघून गेला. या अपघातानंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक घोसाळकर करीत आहेत.









