प्रतिनिधी/चिपळूण
तत्काळ निदान होऊन उपचार मिळावेत, संसर्ग रोखता यावा यासाठी तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ बुधवारपासून सती येथून झाला. येथे पहिल्यादिवशी 31 जणांची अँटीजेन चाचणी केली असता या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले, ही दिलासादायक बाब आहे. सध्या स्वॅब घेतले जात असून अहवाल येण्यास उशीर होत असल्याने सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या 1917वर थांबली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून ही मोहीम राबवली जात आहे. बुधवार व गुरूवार असे दोन दिवस सती-चिंचघरी, 25 व 26 रोजी अलोरे लघुपाटबंधारे विभाग हॉस्पिटल, 27 व28 रोजी पिंपळी उपकेंद्रात कोरोना तपासणी होणार आहे. सती येथे पहिल्यादिवशी झालेल्या 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ही चांगली बाब ठरली आहे. मात्र तरीही ग्रामस्थांनी येथे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्याधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी केले आहे.
पवनतलाव येथे 29जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत, तर सावर्डे येथील तपासणी बंद करण्यात आली आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या 1917 वर गेली आहे. सध्या 363 जणांवर विविध ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, तर सुमारे 150 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कोरोनाने तालुक्यातील 56जणांचा बळी घेतला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









