प्रतिनिधी / चिपळूण
काही दिवसांपूर्वी शहरातील रंगोबा साबळे रोड परिसरात तब्बल 27 लाख रूपये किंमतीचा गुटखा चिपळूण पोलिसांनी जप्त केला आहे. यापकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. मात्र शहरासह तालुक्यातील टपऱया, दुकानांमधून आजही गुटख्याची खुलेआम विकी सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास म्हणजे जखम मांडीला आणि औषध शेंडीला असा असल्याची टीका होत आहे. दुसरीकडे अन्न व औषध पशासन केवळ तकार देऊन शांत बसल्याने हे प्रकरणच संशयाच्या भोवऱयात सापडले आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील रंगोबा साबळे मार्गालगत नजराना अपार्टमेंट परिसरात आयशर टेम्पो व मारुती इको या दोन
वाहनांमध्ये गुटखा भरुन विकीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकून मुश्ताक जिकर कच्छी, अंकुश सुनील केसरकर, संदीप भैरु पाटील यांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल 26 लाख 9 हजार 150 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. त्यानंतर मुख्य वितरक भूषण श्रीकृष्ण शिरसाट याला बांदा-सावंतवाडी येथून अटक करण्यात आली.
प्रारंभीचा तपास पहाता पोलीस मोठी कारवाई करतील असे वाटत होते. पोलिसांनीही पकरणाची पाळेमुळे खणून काढू असे जाहीर केले होते. सध्या चारही आरोपी अटक आहेत. मात्र आजही मोठ्यापमाणात गुटखा येथे येत असून शहरातील पत्येक टपरीसह ग्रामीण भागातील दुकानांमधून त्याची खुलेआम विकी होताना दिसत आहे. पोलीस मात्र यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे गुटखा वाहतूक व विकी यातील महत्वाचा दुवा असलेल्या टपरी चालक व दुकानदारांना अभय का, असा पश्न उपस्थित होत आहे.
अशा अवैध विकीवर नजर ठेवण्याची खरी जबाबदारी असलेल्या अन्न व औषध पशासनाचे अधिकारी केवळ तकार देऊन शांत बसले आहेत. त्यानंतर त्यांनी कोणत्याही भागात तपासणी केल्याचे वृत्त नाही. त्यामुळे पोलिसांनी अशी वाहतूक पकडल्यानंतर केवळ पंचनामा व तकार देण्यासाठीच हा विभाग आहे का, असा पश्न उपस्थित होत असून पोलिसांचा तपास व अन्न-औषध पशासनाची भूमिका यामुळे हे पकरणच संशयाच्या भोवऱयात सापडले आहे.
तपास सुरू आहे- देवेंद्र पोळ
याबाबत पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याशी संपर्प साधला असता ते म्हणाले की, गुटखा पकरणाचा तपास सुरू आहे. तपासाच्या अनुषंगाने अजून अनेक बाबी करणे बाकी असून त्या योग्यवेळी केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Previous Articleचव्हाट गल्लीत वाहतूक कोंडी
Next Article कार्तिकी एकादशीच्या उत्सावाला सशर्त परवानगी









