चिपळूण
कळकवणे येथे श्री दत्त प्रसारक युवक मंडळाच्यावतीने श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित कबड्डी प्रिमिअर लीग स्पर्धेत मैत्री स्पोर्टस् विजेता तर कार्तिका वॉरियर्स उपविजेता ठरला.
तसेच उपांत्य उपविजयी म्हणून बंधू चव्हाण मित्रमंडळ व उपांत्य उपविजयी म्हणून काव्या राईजिंग स्टार्स, सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संकेत घडशी, उत्कृष्ट पक्कड म्हणून सुयोग झुजम (दोघेही मैत्री स्पोर्ट्स), उत्कृष्ट चढाई म्हणून कार्तिकी वॉरियर्सचा सिद्धेश कदम, उदयोन्मुख खेळाडू म्हणून बंधू चव्हाण मित्रमंडळाचा प्रथमेश जागडे, तसेच स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा मानकरी ओवी स्पोर्टस् संघाचा शुभम कदम तर दुसऱया दिवसाचा मानकरी युवा पलटण संघाचा तेजस जागडे आदींना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिव्हाळा मार्टचे मंगेश पेढामकर, रमेश नांदलस्कर, भाजपा तालुका उपाध्यक्ष सुरेश कदम, दीपक म्हादम, शिवसेना विभागप्रमुख वीरकुमार कदम, अक्षय कदम, सौरभ कदम, पनवेलचे आरटीओ निरीक्षके मल्हार शिंदे, सुरेश शिंदे, बाबा शिंदे, मंडळाचे अधक्ष सुनील कदम, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रदीप शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.









