प्रतिनिधी / चिपळूण
गेल्या आठवडाभरात अतिवृष्टी तसेच पुरामुळे तालुक्यात मोठ्याप्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे स्थळपाहणी करून संयुक्त पंचनामे करण्याच्यादृष्टीने तहसीलदार जयराज सूर्यवंशी तालुक्यातील 167 गावांसाठी 163 कर्मचारी नियुक्त केले आहेत. पंचनाम्याचे काम सुरू झाले असून आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
गेला आठवडाभर होत असलेल्या अतिवृष्टी व पुरांमुळे मोठ्याप्रमाणात शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाले तुडूंब भरून वाहू लागल्याने कापणीला आलेले भातपीक आडवे झाले. काही गावांत कापणी करून शेतात ठेवण्यात आलेले पीक पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेले. वर्षभर मेहनत करून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहे. असे असतानाच शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल खात्याला दिले आहेत. यामध्ये 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









