प्रतिनिधी /फातोर्डा
वागुळे-मडगाव येथील चिन्मय मिशनच्या बालसंस्कार केंद्रात साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पेंद्राच्या मार्गदर्शक पुष्पा गायतोंडे यांनी प्रास्ताविक केले. साने गुरुजींबद्दल बोलताना त्यांनी भारतमातेचे थोर? सुपुत्र, राष्ट्रीय सेवाभावी संत, दिनदलितांचे कैवारी, थोर साहित्यिक, स्वातंत्रलढय़ातील सेनानी, आदर्श मातृ-पितृभक्त, गुणी शिक्षक अशा शब्दांत वर्णन केले.
बालसंस्कार केंद्रामध्ये येणारी मुले भविष्यात आदर्श नागरिक बनावीत म्हणून त्यांनी साने गुरुजींच्या दोन कथा सांगितल्या. उपस्थित राहू न शकलेल्या मुलांना ऑनलाईन पद्धतीने कथा सांगण्यात आल्या. मुलांनी प्रार्थना सादर केली. गायतोंडे यांनी दीपप्रज्वलन केले. पालक शुभांगी मांदेकर यांनी साने गुरुजींच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमात विद्यार्थी ?अविनाश मांदेकर, अमित, सुमित, दिविजा, मोहीम, ओजस, दिया गायतोंडे, अयान कोसंबे, ईशा श्रेयान यांचा सहभाग होता. प्रेरणा मांदेकर यांनी आभार मानले. सोनाली यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.









