ऑनलाईन टीम / बीजिंग :
लडाख सीमेवरील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पश्चिम विभाग प्रमुखपदी झँग शुडाँग यांची निवड करण्यात आली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ही निवड केली आहे.
जिनपिंग हे केंद्रीय लष्करी आयोगाचे प्रमुख आहेत. त्यांनी चार वरिष्ठ लष्करी आणि सशस्त्र पोलीस अधिकाऱ्यांना बढती दिली. त्यामध्ये लष्करी आयोगाच्या पायाभूत सुविधा खात्याचे राजकीय समन्वयक गुओ पुशीयाओ, व्युहात्मक पाठबळ दलाचे राजकीय समन्वयक ली वेई आणि कमांडर वँग चुनींग यांचा समावेश आहे.
भारत-चीन सीमेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पश्चिम विभागाची आहे. मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये झालेल्या भारत-चीन सैन्यातील संघर्षानंतर दोन्ही देशात तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.









