ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना व्हायरसने जगभरात मोठय़ा प्रमाणात फैलावत आहे. त्यातच आज सकाळी दिल्लीहून पुण्याला येणाऱया एअर इंडियाच्या विमानात एका चीनी प्रवाशाला उलटय़ांचा त्रास झाला. विमान पुण्यात उतरल्यानंतर त्या प्रवाशाला तातडीने पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. खबरदारी म्हणून त्या प्रवाशाच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, ली सियोन असे या प्रवाशाचे नाव आहे. या प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने विमानात उलटय़ा झाल्या व त्यानंतर या प्रवाशाला नायडू हॉस्पटिलमध्ये हलवण्यात आलंय. त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा या विमानाने दिल्लीला उड्डाण केले.