कुपवाड एमआयडीसीतील पेंटॉगॉन इंडस्ट्रीज कंपनीला बसला फटका : चौघांविरोधात गुन्हा
प्रतिनिधी / कुपवाड
चीनमधील एका कंपनीने कुपवाड एमआयडीसीतील पेंटॉगॉन इंडस्ट्रीज प्रा लि. या कंपनीला तब्बल साडेबारा लाखाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघड़कीस आला. याप्रकरणी कुपवाड़ पोलिसात चीनच्या कंपनीसह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पेंटॉगॉन कंपनीत तयार झालेले उत्पादन चीन देशातील एका कंपनीने घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्या कंपनीचे पदाधिकारी, बॅंकेचे अधिकारी व अज्ञात दोन इसमानी सर्व उत्पादन नेले. त्यानंतर पेंटॉगॉन कंपनीचा ईमेल आयडी हॅक केला आणि परस्पर बँक खात्यावर रक्कम वर्ग केल्याचे त्या कंपनीने कळविले. परंतु, रक्कम अद्याप मिळाली नव्हती. त्यामुळे चीनच्या कंपनीने पेंटॉगॉन कंपनीची 12 लाख 29 हजारांची फसवणूक केल्याबाबतची फिर्याद पेंटॉगॉन कंपनीचे व्यवस्थापक मिलिंद सावंत यांनी कुपवाड पोलिसांत दिली.
पेंटॉगॉन इंडस्ट्रीज ही कंपनी कुपवाड एमआयडीसीत आहे. या कंपनीत तयार झालेले उत्पादन चीनमधील एका कंपनीला देण्याचे ठरले होते. त्यानुसार त्या कंपनीचे काही पदाधिकारी व तेथील बारक्लेस बॅकेचे अधिकारी व दोन अज्ञात इसम यांनी मिळून 19 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत कंपनीचा माल नेला. त्या उत्पादनाची रक्कम 12 लाख 29 हजार 88 रुपये इतकी होते. ती रक्कम दिलीच नाही. उलट त्या कंपनीने रक्कम न देता पेंटॉगॉन इंडस्ट्रीजचा ईमेल आयडी हॅक करून बनावट ईमेल आयडी तयार केला. त्यावर तसेच बॅक खात्याची खात्री न करता परस्पर बॅक खात्यावर रक्कम वर्ग केल्याचे कंपनीने सांगितले. परंतु, रक्कम मिळालीच नाही. त्यामुळे पेंटॉगॉन कंपनीची 12 लाख 29 हजार 88 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पेंटॉगॉन कंपनीने कुपवाड पोलिसात दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी चीनच्या त्या कंपनीसह जबाबदार चौघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे करीत आहेत.









