बेळगाव : वरेरकर नाटय़ संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी येथे भरलेल्या कोल्हापूरचे चित्रकार एस. निंबाळकर यांच्या चित्रप्रदर्शनाच्या अनुशंगाने बुधवारी त्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. एस. निंबाळकर यांनी जलरंगामध्ये निसर्ग चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखविले.
साधारण 45 मिनिटे त्यांनी चित्र रेखाटून दाखविले. याप्रसंगी चित्रकार किरण हणमशेट, महेश होनुले, सुभाष देसाई व चंद्रशेखर रांगणेकर यांच्यासह कला शाखेचे विद्यार्थी व कला रसिक उपस्थित होते.









