ऑनलाइन टीम / मुंबई :
प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. या मुद्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ही टीका त्यांनी ट्विटरच्या माध्यामातून केली आहे.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱया राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय.
त्या म्हणाल्या, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात मोलाची भूमिका बजावली आहे. या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध देखील त्यांनी केला आहे.









