बेंगळूर/प्रतिनिधी
चित्रपट निर्माता इंद्रजित लंकेश यांनी असा दावा केला आहे की कन्नड फिल्म इंडस्ट्रीत किमान १५ लोक ड्रग्सच्या तस्करीमध्ये सहभागी आहेत.
लंकेश सोमवारी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या सीसीबीसमोर हजर झाले होते आणि कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्स तस्करीच्या त्यांनी केलेल्या आरोपावरून सीसीबीने त्यांची चौकशी केली, अशी माहिती आहे. लंकेश यांनी कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रगचे नेटवर्क मोठे असल्याचा आरोप केला होता. अभिनेता आणि अभिनेत्रींवररेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना लंकेश यांनी मी ज्यांना ओळखतो अशा १५ लोकांची नावे सीसीबीला सांगितली आहेत. तसेच संदलवाडमध्ये चित्रपट उद्योगातील काही ड्रग माफिये पार्ट्या आयोजित करतात. कन्नड फिल्म इंडस्ट्रीत मुंबई अंडरवर्ल्डमधून होणारी अमली पदार्थाची तस्करी नाकारता येणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.









