वार्ताहर / व्हनाळी
साके ता. कागल या ग्रामीण भागातील व सध्या कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेले मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहणारे चित्रपट कवी, शाहिर, लेखक बापू आबा घराळ यांचे वयाच्या 71 व्या वर्षी दुखद निधन झाले.
त्यांच्या लेखणीतून फुकट चंबू बाबुराव, देखणी बायको नाम्याची, खुर्ची सम्राट, झाली कृपा जोतिबाची, करतंय गाव भुताचं नाव आदी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहीली. पांढरीजा राजा भैरबा माझा, सुखाची सावली आंबाबाई, नाथ पंढरीचा, घरात लागलय गळतं, रंगेल रिक्षावाला, आंबट कैरी, आदी अॅडिओ कॅसेट त्यांच्या प्रसिध्द झाली आहेत. तसेच कोल्हापूरी थाट, पैजणांची रूमझूम, महाराष्ट्राची पंरपरा, साहित्य सुगंध, गावराण गोडवा आदी काव्यसंग्र प्रसिद्ध आहेत. पुढारी आलं गावात, आंबेवाली मैना, घुंरगू तुटलं, इंद्राचा दरबार आदी नाटकांचे लिखाणही त्यांनी केले होते.
आकाशवाणी रेडिओ वरून त्यांचे विविध गाण्याचे कार्यक्रम तसेच दुरदर्शन वाहिणीवर लावण्या, लोकगिते, भक्तीगिते, गोंधळ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची अनेक काव्यसंग्र, कथा, समाजप्रबोधन कारक लेखणाची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना विविध संघटना फाडेशन शासनामार्फत विविध पुरस्कार देवून गोरविण्यात आले होत. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा सुन, नातवंडे असा परिवार आहे.








