बांधकाम सुरू असलेल्या घरातच मृतदेह
प्रतिनिधी/ चिकोडी
शहरातील होस्पेट गल्ली येथे स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीच 27 वषीय युवकाचा खून करण्यात आल्याची घटना काल मध्यरात्री घडली. घराचे रंगकाम करण्यासाठी आलेल्या मजुरांना घरमालकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात पडलेला दिसल्यानंतर शनिवारी सकाळी दहा वाजता ही घटना उघडकीस आली. रमजान शब्बीर कमते (वय 27) असे मृत युवकाचे नाव आहे.
रमजान हा सर्वांशी खेळीमेळीने राहत होता. त्एका वर्षापूर्वी त्याचा इचलकरंजी येथील नातलगातील मुलीशी विवाह झाला होता. त्याची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली आहे. रमजान याचे चाळीस जणांचे कुटुंब असून सर्वजण विभक्त झाले आहेत. रमजान याला दिलेल्या इमारतीच्या घराच्या खालच्या मजल्यावर त्यांचा भाऊ वास्तव्य करतो. वरील मजल्यावर रमजान घराचे बांधकाम करीत होता. बांधकाम पूर्ण झाले असून सध्या रंगकाम सुरू आहे. रंगकाम करण्यासाठी कामगार आले असता रमजान याचा मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात दिसून आला. त्यांनी तातडीने कमते कुटुंबियांना याबाबत माहिती दिली.
कमते कुटुंबियांनी पोलिसांना कळविताच पोलीस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक, निरीक्षक आर. आर. पाटील, उपनिरीक्षक राकेश बगली, अशोक कुळ्ळूर व सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रमजान याला कुठेतरी बाहेर मारहाण करून त्याच्या घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आणून त्याच्या डोक्मयात धरदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यानंतर त्याच्या डोक्मयातून वाहणारे रक्त अज्ञात आरोपींनी रंगकामासाठी ठेवण्यात आलेल्या बादलीत भरण्याचा प्रयत्न केला असल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते.
खूनाच्या या घटनेने चिकोडी शहरात एकच खळबळ उडली आहे. विच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसस्कारासाठी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. परिसरातील नागरीकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती.









