साहित्यः अर्धा किलो चिकन, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा लिंबूरस, चवीपुरते मीठ, 1 चमचा कलोंजी, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा तेल, 2 कांदे चिरून, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी, 2 चमचे लाल तिखट पावडर, 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा हळद पावडर, 2 चमचे दही, 1 चमचा व्हिनेगर, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृतीः चिकन स्वच्छ करून अर्धा इंच तुकडे करून घ्यावेत. त्यात आमचूर पावडर, लिंबूरस आणि मीठ मिक्स करून अर्धा तास मॅरीनेटसाठी झाकूण ठेवावे. थोडय़ाशा गरम तेलात कलोंजी, जिरं, मोहरी आणि बडीशेप परतवून गार करावे. नंतर मिक्सरला लावून त्याची पावडर बनवून घ्यावी. त्याच कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा टाकून हलक्या सोनेरी रंगावर परतवून घ्यावा. नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, लाल तिखट पावडर, धणे पावडर आणि हळद पावडर टाकून तेल सुटेपर्यंत परतवावे. नंतर त्यात मॅरीनेट चिकन मिक्स करून शिजवून घ्यावे. आता त्यात दही, व्हिनेगर, मिक्सरला लावलेली मसाला पावडर, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण मिक्स करावे. वाटल्यास आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. मिश्रण मंद आचेवर गरम करून आच बंद करावी. आता तयार चिकन रोटी अथवा चपातीसोबत खाण्यास द्या.









