प्रतिनिधी / सातारा
व्यसन खूप वाईट असते मग ते तंबाखूचे असो किंवा दारुचे या व्यसनाचे दुष्परिणाम दिसत असून ही अनेकजण त्यास बळी पडतात. मात्र, व्यसनाला मुळापासूनच उखडून टाकायचे असेल तर प्रत्येक घरातील लहान मुलांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले पाहिजेत. याच सूत्रानुसार वाई तालुक्यातील चिंधवली शाळेचे मुख्याध्यापक अनिल जाधव यांनी कार्य सुरू केले आहे. गेल्या दीड वर्षात चिंधवली शाळेत एवढा त्यांनी बदल केला आहे की चिंधवली शाळेत घुमतोय तंबाखूमुक्तीचा गजर, त्यामुळेच गाव ही तंबाखूमुक्तीच्या वाटेवर आहे. याचाच डंका राज्य पातळीवर गाजत आहे.
व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांची घरे बरबाद झाली आहेत. व्यसनापासून पिढी वाचवायची असेल तर व्यसनमुक्तीची गरज आहे. हेच ओळखून जावली तालुक्यातील भणंग गावचे सुपुत्र अनिल जाधव यांनी जेथे शिक्षक म्हणून सेवा केली. त्या त्या शाळेवर बदल घडवला. शाळा व शाळेचा परिसर, गाव तंबाखु मुक्त केले आहे. त्यांची बदली दीड वर्षांपूर्वी मुख्याध्यापक म्हणून चिंधवली शाळेवर झाली. शाळेतला प्रत्येक विद्यार्थी चांगला शिकला पाहिजे यासाठी त्यांनी ज्ञानरचना वादचा प्रयोग यशस्वी केला. त्यामुळे शाळेचा पट वाढला. मुलांना स्पर्धा परीक्षेत स्टेज डेअरिंग महत्वाचे असते. त्या अनुषंगाने पुस्तकी ज्ञानाबरोबर त्यांनी मुलांना सर्वगुण संपन्न असे शिक्षण देण्याचा प्रयोग अगदी लॉकडाऊनमध्ये सुरू ठेवला.
अशी झाली सुरुवात चिंधवली शाळेत
मुख्याध्यापक अनिल जाधव हे नवनिर्माण करणारे शिक्षक म्हणून ओळख आहे. त्यांनी चिंधवली शाळेत आल्यानंतर मुलांना तंबाखूचे दुष्परिणाम पटवून सांगितले. गावात गुटख्याच्या आणि तंबाखूच्या रिकाम्या पुढ्या गोळा करून चौकात होळी केली. अन् सुरुवात झाली तंबाखूमुक्त शाळेला. शाळेतील विध्यार्थीमध्ये पथनाट्य सादरीकरण करून जागृती सुरू केली. त्यामुळे चिंधवली गावात सध्या निम्याहुन अधिक ग्रामस्थांनी तंबाखू सोडली आहे.
कोरोना काळात जनजागृती सुरू
स्वतः मुख्याध्यापक अनिल जाधव हे कविता, पोवाडा लेखन करतात. त्यांनी मुलांना लिहते केले आहे. शाळेतील विध्यार्थ्यांनी कविता लिहल्या असून लवकरच पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र,सध्याच्या कोरोना काळात ही त्यांनी जागृती केली आहे. नुकताच त्यांचा विध्यार्थी श्रवण इथापे याने राज्य पातळीवर यश मिळवले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









