ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक म्हणजेच 12 हजार 881 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 334 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 3 लाख 66 हजार 946 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 12237 एवढी आहे.
सध्या देशात 1 लाख 60 हजार 384 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 94 हजार 325 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून सध्या हे प्रमाण 52.95 टक्के आहे. तसेच देशात आतापर्यंत 62 लाख 49 हजार 668 नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये मागील चोवीस तासात 1,65,712 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देण्यात आली.