ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाच्या छायेत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का बसला आहे. ट्रम्प यांचे स्टाफ चीफ मार्क मीडोज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांची चिंता आणखी वाढली आहे.
अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मीडोज कोरोना पॉझिटिव्ह आढळले. बुधवारी सकाळी डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमधील एका खोलीत असताना जवळपास दीडशे सहाय्यक आणि समर्थकांसह मीडोजही या गर्दीत सहभागी झाले होते. त्यामुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आतापर्यंत व्हाईट हाऊसशी संबंधित तीन डजन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प त्यांची पत्नी मेलानिया आणि त्यांचा छोटा मुलगा बॅरन यांचाही समावेश होता. उपाध्यक्ष माईक पेन्स यांचे प्रमुख मार्क शॉर्ट आणि इतर सहकाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी गेल्या महिन्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.









