ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
संपूर्ण देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच औरंगाबादमधुन चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
औरंगाबाद शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. आज पुन्हा कोरोनाचे 11 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. नूर कॉलनीत 9, गारखेड्यात एक तर भीमनगरमध्ये 1 रुग्ण वाढलाय. औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 120 वर पोहोचलीय.
औरंगाबादेत रुग्णांची वाढती संख्या पाहता संचार बंदी आता अधिक कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे त्यानुसार बुधवार पासून औरंगाबादेत अत्यावश्यक सेवेची दुकान सकाळी 7 ते 11 सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, सोबतच रमजानच्या महिन्यात संध्याकाळी विशेष फळ बाजाराला मुभा देण्यात आली होती तीसुद्धा रद्द करण्यात आली आहे.
या शहरात 15 मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. परदेशातून आलेल्या एका महिलेला संसर्ग झाला. त्यानंतर तब्बल 15 दिवस शहरात नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, आता पुन्हा या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.









