ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
संपूर्ण देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच औरंगाबादमधुन चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरात आज पुन्हा कोरोनाचे 55 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 742 वर पोहोचली आहे.
औरंगाबाद मध्ये पहिला रुग्ण 15 मार्च रोजी सापडला होता. मात्र, गेल्या महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने फैलावत आहे. हा आकडा 700 च्या पुढे पोहचला आहे.
गुरुवारी दिवसाच्या सुरुवातीलाच 55 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आत्तापर्यंत 20 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. मागील दोन दिवसात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे आता पर्यंत 25 पेक्षा अधिक जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.









