ऑनलाईन टीम
राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात तब्बल 63 हजार 294 नव्या रुग्णांची भर पडली. तर मृतांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असून 349 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. आजपर्यंत राज्यात 57 हजार 987 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर 1.7 टक्के एवढा आहे. तर राज्यात आज रोजी एकूण 5 लाख 65 हजार 587 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ही आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे.
दरम्यान, आज दिवसभरात 34 हजार 8 रुग्ण कोरोनातून बरे झाले. राज्यातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 81.65 टक्के एवढा झाला आहे. आतापर्यंत 27 लाख 82 हजार 161 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात सुरू असणाऱ्या विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. तरीही कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. लसीकरण मोहिमेतही लसींच्या तुटवड्यामुळे अडथळे निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य शासन कठोर लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची बैठक झाली. आता उद्याच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत 34 हजार `रेमिडीसीव्हीर’चा पुरवठा
Next Article शाहूनगरात घरफोडी करुन 59 हजारांचा ऐवज लंपास








