ऑनलाईन टीम
राज्यात वाढत्या कोरोना फैलावामुळे लॉकडाऊनची तयारी सुरू आहे. सध्या संचारबंदीचे कडक निर्बंध असतानाही कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 568 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. तर 67 हजार 468 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे निर्बंध असतानाही कोरोनाचे भीषण रुप दिवसेंदिवस अधिकच भीषण होत असून रुग्णवाढ आणि मृत्यू नियंत्रणात येत नसल्याचे दिसत आहे.
राज्यात आज 568 मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 61 हजार 911 वर गेला आहे. तर मृत्यूचा दर 1.54 टक्क्यांवर आहे. मृतांच्या आकड्याबरोबरच कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी भर पडली आहे. आज 67 हजार 458 रुग्ण आढळल्याने आत्तापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 40 लाख 27 हजार 827 झाली आहे. यामध्ये सध्या 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात कोरोनातून बरे होण्याच म्हणजेच रिकव्हरी रेट 81.15 टक्क्यांवरच आहे. आज दिवसभरात 54 हजार 985 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत 32 लाख 68 हजार 449 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








