ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा उच्चांकी संख्या गाठली आहे. शुक्रवारी दिवसभरात रुग्ण संख्येने 10 हजारांचा टप्पा ओलांडला. काल तब्बल 10 हजार 216 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 53 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 लाख 98 हजार 399 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 52 हजार 393 एवढा आहे.

- नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण
काल नोंद झालेल्या 10,216 रुग्णांमध्ये नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 1,225 रुग्ण आढळून आले. पुणे शहर 849 पिंपरी-चिंचवड 549, उर्वरित पुणे जिल्हा 369, नाशिक शहर 352, जळगाव जिल्हा 540, सातारा 214, औरंगाबाद 318, अकोला 148, अमरावती शहर 435, यवतमाळ 251 आणि वाशिममध्ये 207 नवे रुग्णांची नोंद झाली.
- मुंबईत 1,173 नवे रुग्ण
मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे 1,173 नवे रुग्ण आढळले तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णांची संख्या पुन्हा एकदा हजाराच्या पुढे गेली असून रुग्ण दुपटीचा कालावधी 241 दिवसांपर्यंत खाली गेला आहे.
- 88,838 ॲक्टिव्ह रुग्ण
कालच्या एका दिवसात 6,467 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 20 लाख 55 हजार 951 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 88 हजार 838 रुग्ण उपचार घेत आहेत.








