ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बुधवारी देशात 35 हजार 178 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 440 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 35 हजार 178 रूग्णांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. सध्या देशात 3 लाख 67 हजार 415 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत देशात एकूण 3 कोटी 14 लाख 85 हजार 923 जण कोरोनामुक्त झाले आहे.
- मंगळवारी आढळले होते 25,166 नवे रूग्ण
मंगळवारी पाच महिन्यांनंतर कोरोनाचे सर्वात कमी रूग्ण आढळून आले होते. मंगळवारी देशात 25 हजार 166 नव्या रूग्णांची वाढ झाली होती. मंगळवारच्या मानाने आज 10 हजार अधिक रूग्ण आढळून आले आहेत. आज ही संख्या 35 हजार पेक्षा अधिक आहे. तर कालच्या दिवशी 437 जनांचा मृत्यू झाला होता तर 36,830 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
- मागील 24 तासात 55 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण
मागील 24 तासात 55,05,075 नागरिकांना लस टोचण्यात आली. तर आत्तापर्यंत देशात 50 कोटी 06 लाख 52 हजार 032 नागरिकांना लसींचे डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी 88.13 लाख नागरिकांना लस देण्यात आली होती. जो आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा होता.
त्याचबरोबर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 49 कोटी 84 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी सुमारे 17.97 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर 3 टक्क्मयांपेक्षा कमी आहे.