ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत आज दिवसभरात 2,509 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 79 हजार 569 वर पोहचली आहे. यामधील 16 हजार 502 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आज 1858 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 58 हजार 586 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4481 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 16 लाख 36 हजार 518 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 7870 आरटीपीसीआर टेस्ट आणि 20,965 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.









