ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. प्रदेशात मागील चोवीस तासात 708 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 11 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 30 हजार 034 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 102 आणि काश्मीर मधील 606 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 6 हजार 965 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1491 आणि काश्मीरमधील 5474 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 22 हजार 497 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 5116 रुग्ण जम्मूतील तर 17381 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 572 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 41 जण तर काश्मीरमधील 531 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 4 लाख 21 हजार 057 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 42 हजार 323 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 6 हजार 965 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.









