ऑनलाईन टिम : उदयपूर
काँग्रेसवर ( Indian National Congress ) टिका केली जाते कारण कॉंग्रेसकडे पक्षांतर्गत टिकांना परवानगी देण्याची परंपरा आहे.” असे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी सांगितले. उदयपूरमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) चिंतन शिबिरात बोलत होते. काँग्रेसचा सर्वसामान्यांशी असलेला संपर्क तुटला असल्याचे मान्य करून जनतेपर्यंत पोहोचून त्याचं निराकरण करावं लागेल, असही त्यांनी मान्य केलं.
“आपल्याला लोकांसोबतचे आपले जुने नाते तुटले आहे हे स्वीकारलेच पाहिजे. त्याचबरोबर ते पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. पण हे कोणत्याही शॉर्टकटने होणार नाही, त्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत,” असे राहूल गांधी म्हणाले.केंद्र सरकारवर हल्ला करताना गांधी म्हणाले, “पेगासस हे सॉफ्टवेअर नसून ते देशातील राजकीय वर्गाला शांत करण्याचा एक मार्ग आहे, तसेच राजकीय संभाषणाचा गळा दाबण्याचा एक मार्ग आहे.”
काँग्रेस नेतृत्वाने CWC च्या बैठकीत संघटनात्मक सुधारणा करण्यासाठी आणि देशातील प्रमुख मुद्द्यांवर, देशासमोरील आव्हानांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अंतिम फेरीत चर्चा केली आहे. “या देशातील इतर कोणता राजकीय पक्ष अशा प्रकारच्या संवादची परवानगी देईल काय? भाजप (BJP) आणि आरएसएस (RSS) असे कधीच होऊ देणार नाहीत हे नक्की. भारत हा राज्यांचा संघ आहे, भारतातील लोक संघ स्थापन करण्यासाठी एकत्र येतात,” असे गांधी यांनी या कार्यक्रमात सांगितले.