मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
जळगाव/प्रतिनिधी
काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. पण हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याआधी संपूर्ण महाराष्ट्राने कोल्हापूर आणि सांगलीची पहिली आहे.
जळगाव जुईल्ह्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव आणि चाळीसगावमधील नदी – नाल्यांना पूर आला आहे. चाळीसगावातील पुरामध्ये काही नागरिकांसह जनावरं सुद्धा वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात सर्वदूर धुवादार पाऊस पडत आहे. जळगाव – चाळीसगावमध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे.
चाळीसगाव तालुक्यात पुरानं हाहाकार माजवला असून या पुरत ५ ते ७ जण वाहून गेल्याची भीती आहे. तर ७०० जनावरेही वाहून गेल्याची माहिती आहे. आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी चाळीसगाव पूर परिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे.








