वृत्तसंस्था / कोलकाता
सार्वजनिक क्षेत्रातील कोळसात उत्पादनांतील कंपनी कोल इंडिया लिमिटेड चालू वित्त वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात घसरण राहणार असल्याचा अंदाज आहे. विश्लेषकांच्या माहितीनुसार मागणीत मंदीचे वारे वाहत असल्याच्या कारणामुळे सदरचे उत्पादन हे 60 कोटी टनाच्या खाली राहणार असल्याचे म्हटले आहे.
मागील वित्त वर्षात 2019-20 मध्ये कंपनीने कोळसा उत्पादन 60.2 कोटी टन राहिले होते. खनन कंपनीचे उत्पादन 2020-21 मध्ये जवळपास 58 कोटी टन राहण्याचे संकेत आहेत. संशोधकांनी निश्चित ध्येय 65 ते 66 कोटी टन ठेवले आहे.
ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवाल यांनी कोल इंडियाचे उत्पादन 58.2 कोटी टन आणि उठाव 56.5 कोटी टन राहण्याचा अंदाज मांडला आहे. तसेच आयसीआयसीआय सिक्मयुरिटीजने चालू वर्षात उत्पादन 58 कोटी टन आणि विक्री 55 कोटी टन राहणार असल्याचे म्हटले आहे. कोल इंडियाचे कोविड19 च्या संकटामुळे उत्पादन प्रभावीत झाले आहे.
कंपनीचा निश्चित अंदाज
कोळसा कंपनी कोल इंडियाने सुरुवातीच्या काळात चालू वित्त वर्षासाठी जवळपास 71 कोटी टन उत्पादन होणार असल्याचे ध्येय निश्चित केले होते. परंतु बाजारातील सध्याच्या कोविडच्या स्थितीमुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे यात काही प्रमाणात घट होण्याची भीती विविध कंपन्यांनी व्यक्त केली आहे.









