कोळसा सचिव अनिल जैन यांची माहिती : 70 कोटी टनाचे ध्येय, आयातीत घट करण्याचा विचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील कोळसा उत्पादन चालू 2020-21 आर्थिक वर्षात नवीन विक्रम नोंदवत हे उत्पादन 70 कोटी टनाच्या घरात पोहोचणार असल्याचा दावा कोळसा सचिव अनिल जैन यांनी नुकताच केला आहे. देशामध्येच जादा उत्पादन केल्यामुळे कोळसा आयात कमी करण्यास यामुळे मदत होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.
मागील 2019-20 आर्थिक वर्षात देशात कोळसा उत्पादन 60.21कोटी टन झाले होते. परंतु हे उत्पादन त्याच्या अगोदरच्या वर्षात 2018-19या वर्षात60.6 कोटी टन झाल्याचे जैन यांनी स्पष्ट केले आहे. याबरोबर दुसऱया बाजूला देशाला वार्षिक पातळीवर 23.5 कोटी टन कोळसा आयात करावा लागतो. वीज निर्मिती प्रकल्प आणि कारखान्यांना कोळशाची आवश्यकता असल्यामुळे सदरची आयात कोणत्याही परिस्थितीत थांबविण्यात येत नसल्याचेही म्हटले आहे. परंतु मुख्य आयातीच्या टक्केवारीत आम्ही कपात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जैन यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5,000 अब्ज डॉलरवर पोहोचविणार असल्याचे ध्येय निश्चित केले आहे. ते प्राप्त करण्यासाठी देशाला ऊर्जेची आयात कमी करुन देशातील संसाधनांना चालना दिली जाणार आहे.
देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. याच काळात कोविड19च्या संकटाने देशासह जगाचे आर्थिक गणित बिघडवून टाकले आहे. त्यामुळे सदरचे ध्येय प्राप्त करण्यात आणखी अडचणी येण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.
2023-24 मधील ध्येय
कोल इंडियाने आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत एक अब्ज टन कोळसा उत्पदनाचे ध्येय निश्चित केले आहे. मागील आर्थिक वर्षात कोळसा उत्पादनाचे ध्येय 66 कोटी टनापेक्षा कमी राहिले होते. कोळसा खाणींमध्ये पाणी भरल्याने ध्येय साध्य करण्यात अडचणी आल्याचे सांगण्यात येते.
कोविड 19चा प्रभाव
वीज निर्मिती प्रकल्पामध्ये आता कोविड 19च्या संकटामुळे 30 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. लॉकडाऊनमुळे कारखाने आणि कार्यालये बंद असल्यामुळे वीज मागणी 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. दुसऱया बाजूला कोल इंडियाजवळ आपल्या खाणीमध्ये विक्रमी 7.5 कोटी टन कोळशाचा साठा आहे तसेच वीज स्टेशनजवळ 4.47 कोटी टनाचा साठा शिल्लक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.








