10 महिन्यांनी रेल्वे पूर्ववत : पुणे-मुंबईला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे उपलब्ध
प्रतिनिधी / बेळगाव
दादर-तिरुनेलवेल्ली व दादर-पुद्दुचेरी (चालुक्मय एक्स्प्रेस), दादर-म्हैसूर (शरावती एक्स्प्रेस) अशा तीन रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे तब्बल 10 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा या रेल्वे धावू लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांना पुणे, मुंबई तसेच दक्षिण कर्नाटकात जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दादर-तिरुनेलवेल्ली (त्रि-साप्ताहिक) रेल्वे दि. 27 फेबुवारीपासून कार्यरत होणार आहे. रात्री 9.30 वा. दादर येथून निघालेली रेल्वे सकाळी 9 वा. बेळगावला पोहोचणार आहे. तिरुनेलवेल्ली येथून निघालेली रेल्वे सायंकाळी 5.45 वा. बेळगावला पोहोचणार आहे. दादर, कल्याण, कर्जत, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेन्नूर, हरिहर, दावणगेरे, बिरूर, कडूर, अरसिकेरे, तिपटूर, तुमकूर, यशवंतपूर, बनसवाडी, होसूर, धर्मपुरी, सालेम, नम्मकल, करूर, दिंडीगल, मदुराई, वृदूनगर, सतूर, कोविलपट्टी, तिरुनेलवेल्ली असे थांबे असणार आहेत.
दादर-पुद्दुचेरी (त्रि-साप्ताहिक) रेल्वे दादर येथून दि. 26 पासून सुरू करण्यात येणार आहे. रात्री 9.30 वा. दादर येथून निघालेली रेल्वे सकाळी 9 वा. बेळगावला पोहोचणार आहे. पुद्दुचेरी येथून निघालेली रेल्वे सायंकाळी 5.45 वा. बेळगावला पोहोचणार आहे. दादर, कल्याण, कर्जत, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळी हावेरी, राणेबेन्नूर, हरिहर, दावणगिरी, बिरूर, कडूर, अरसिकेरे, तिपटूर, तुमकूर, यशवंतपूर, बनसवाडी, कृष्णराजपूरम, बंगारपेठ, जोलरपेट्टाई, काटपाडी, वेल्लोर सेंट असे थांबे असणार आहेत.
दादर-म्हैसूर (साप्ताहिक) रेल्वे दादर येथून दि. 25 पासून धावणार आहे. रात्री 9.30 वा. दादर येथून निघालेली रेल्वे सकाळी 9 वा. बेळगावला पोहोचणार आहे. सकाळी 6.15 वा. म्हैसूर येथून निघालेली रेल्वे सायंकाळी 5.45 वा. बेळगावला पोहोचणार आहे. दादर, कल्याण, कर्जत, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेन्नूर, हरिहर, दावणगिरी, बिरूर, कडूर, अरसिकेरे, हासन, होले नरसीपूर, कृष्णराजनगर असे थांबे असणार आहेत.









