ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
गेले सात महिने कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सूरु आहे. तरी ही केंद्राने या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे ? हे ऐकून घेण्याइतकीही लाज सरकारकडे शिल्लक नाहीय” आता लाल किल्ला प्रकरणानंतर पुन्हा आंदोलनाची हाक देत शेतकरी आता चार लाख ट्रॅक्टर घेऊन थेट संसदेवर मोर्चा काढणार असल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
या आंदोलनात सहभागी होणारे ट्रॅक्टर २५ लाख आंदोलक या देशाचे असून ते अफगाणिस्तानातून आले नाहीत, गेल्या सात महिन्यांपासून शांतेत निषेध करीत आहोत. तरीही दखल घेतल्याने याला लोकशाही कसं म्हणता येईल असे ही टिकैत यांनी म्हटलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना राकेश टिकैत यांनी हा मोर्चा आता केवळ लाल किल्ल्यावर थांबणार नाही. तर थेट संसदेवर ट्रॅक्टर सहीत काढणार आहोत. असे म्हटले आहे.
तसेच २६ जून रोजी देशातील सर्व राज्यांमधील राज्यपाल भवनसमोर शेतकरी आंदोलन करतील. तसेच राज्यपालांना अर्ज देतील. असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात आपण प्रचार करणार आहे. मात्र आम्ही प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उतरणार नाही, असंही टिकैत यांनी स्पष्ट केलं.