कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीतर्फे विविध विकासकामे प्रगतीपथावर
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीने आपल्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये 1 कोटी 18 लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी मंजूर करून घेतला आहे. यामधील काही कामे झाली आहेत. तर काही विकासकामे प्रगतीपथावर काहेत. यासाठी 2020-21 सालाकरीता 14 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत 52 लाख रुपये, 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत 2020-21 सालाकरीता 15 लाख रुपये तर 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत 51 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
शाळा, ग्राम पंचायत कार्यालय दुरुस्ती
कंग्राळी खुर्द येथील मराठी प्राथमिक शाळा, कन्नड प्राथमिक शाळा, आलतगा येथील प्राथमिक शाळा आणि ग्राम पंचायत कार्यालयाची दुरुस्ती, रंगरंगोटी यासाठी 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत 52 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.
चक्कर लाईन गटार 15 लाख रुपये
कंग्राळी खुर्द बेळगाव या मुख्य रस्त्यावरून कलमेश्वर मंदिरमार्गे नारायण गल्ली, कालाकट्टी, शेतवाडीकडे जाणाऱया रस्त्यामधील कलमेश्वर मंदिरपासून मुख्य रस्त्यापर्यंतचा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. यासाठी 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत 15 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. बऱयाच वर्षापासूनच्या या रस्ता निर्मितीबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीकडे पाठपुरावा केला होता. याची दखल ग्राम पंचायतीने घेत हा रस्ता पूर्ण केला. त्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नारायण गल्ली सीसी रस्ता 7 लाख
नारायण गल्लीमधील मुख्य रस्त्यावर सीसी रस्ता करण्यात आला आहे. हा रस्ता 80 मीटरचा करण्यात आला आहे. यासाठी 2021-22 सालाकरीता 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी खर्च करण्यात आला आहे. यासाठी 7 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
पालखी रोड सीसी गटार
नारायण गल्ली मुख्य रस्त्यापासून पालखी रस्त्याकडे जाणाऱया मल्लाप्पा मुतगेकर यांच्या घरापासून मनोहर पाटील यांच्या शेतवडीपर्यंतची सीसी गटार यासाठी 7 लाख 10 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
संभाजी गल्ली, मळेदेव सीसी रस्ता
संभाजी गल्ली येथील मळेदेव परिसरामध्ये सीसी रस्ता यासाठी 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत 3 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
रामनगर तिसरा क्रॉस सीसी रस्ता
रामनगर तिसरा क्रॉस येथील नारायण जाधव यांच्या घरापासून परशराम पावशे यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता यासाठी 3 लाख 50 हजार रुपये. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी 15 लाख रुपये, शिवार गाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी 15 लाख रुपये यामध्ये गावातील कचरा उचलण्यासाठी वाहन खरेदी, कचरा उचल करणाऱया कामगारांचा पगार आणि कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील आणि सदस्य रमेश कांबळे यांनी दिली.
गावातील विकासकामे करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी फगरे, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील, सदस्य रमेश कांबेळे, प्रशांत पाटील, केंपाण्णा सनदी, कल्लाप्पा पाटील, विनायक कम्मार, वैजनाथ बेन्नाळकर, राकेश पाटील, कमला पाटील, मीना मुतगेकर, रेखा पावशे, सुनीता जाधव, मधुमती पाटील, भाग्यश्री गौंडवाडकर, विणा पुजारी, महेश धामणेकर आदी सदस्यांचे सहकार्य लाभले आहे..