पाजपंढरीतील 500 वादळग्रस्त अद्याप वाऱ्यावरचं
वार्ताहर / हर्णै
निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या पाजपंढरीतील तब्बल 500 ग्रामस्थांना अद्याप पहिला हप्ता ही मिळाला नाही. या नुकसान भरपाईसाठी येथील ग्रामस्थ रोजच शासन दरबारी खेपा मारत आहेत. मात्र प्रत्येक वेळी नवीन कारण ऐकायला मिळत असल्याने येथील ग्रामस्थ आता संतप्त झाले असून शासनाने वादळ ग्रास्थानची चेष्टा थांबवावी अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
3 जूनला आलेल्या निसर्ग चक्री वादळाने कोकणाला मोठा तडाखा दिला होता. या वादळात अनेक घरांचे, बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने तातडीने याची दखल घेऊन नुकसान भरपाई पॅकेजची घोषणा केली. त्यानुसार नुक्सन भरपाई मिळण्यास सुरवात झाली.मात्र ठराविक वादळ ग्रस्तांना ही मदत मिळाल्या नंतर उर्वरित ग्रामस्थांना निधी नाही वगैरे कारणे देऊन अद्याप पर्यंत रखडवून ठेवण्यात आले असल्याची चर्चा आहे.
वादळ ग्रामस्थांपैकी काहींना पूर्ण मदत मिळाली आहे. तर अनेकांना पहिला हप्ताही अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शासनाच्या या अजब कारभारा बाबत येथील ग्रामस्थांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले असून रोज शासन दरबारी फेऱया मारायला लावणाऱया प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रश्नी आता पालक मंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
Previous Articleविद्युत वितरण व्यवस्थेचा मनमानी कारभार, शेतकऱ्यांना वालीच नाही
Next Article मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 77 हजारांवर









