प्रतिनिधी/ सातारा
वाई, खंडाळा तालुक्यातील घरफोडय़ा करणाऱया दोन अट्टल चोरटय़ांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांनी चार गुन्हे केल्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्या चोरटय़ांना खंडाळा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. अकेला उर्फ अखिलेश टिमटिम्या भोसले, उमेश उर्फ उम्या इंजीन पवार(दोघे रा. ख्ंाडाळा) अशी त्या दोन चोरटय़ांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा जिह्यातील उघडकीस न आलेले जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

दरम्यान, दि. 8 जुलै 2021 रोजी खंडाळा परिसरात राहणाऱया पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांनी खंडाळा व वाई तालुक्यातील घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत, अशी माहिती खास खबऱयांकडून मिळताच त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सपोनि रमेश गर्जे व सपोनि आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखालील पथकास दिल्या. त्या पथकाने दि. 8 रोजी खंडाळा परिसरात जावून अकेला भोसले, उमेश पवार (दोघे रा. ख्ंाडाळा) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी व कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्यांनी खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी 2, वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 घरफोडीचा भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 घरफोडीचा असे चार घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांना पुढील कार्यवाहीकरता खंडाळा पोलीस ठाणे गु.र.नं. भा.द.वि.स. 454,457, 380 या गुह्याच्या तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार कांतिलाल नवघणे, संतोष सपकाळ, संतोष पवार, पो. ना. शरद बेबले, मंगेश महाडिक, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनील मुल्ला, अमित सपकाळ, रवी वाघमारे, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, राजकुमार ननावरे, पो. कॉ. केतन शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, विक्रम पिसाळ, प्रवीण पवार, चालक पो. कॉ. विजय सावंत, गणेश कचरे यांनी कारवाई केली आहे.








