पॅरिस
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 2015 मध्ये चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी 14 जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. पॅरिसच्या एका न्यायालयाने दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी या 14 जणांना दोषी ठरविले आहे. 7 जानेवारी 2015 रोजी अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत 15 जणांचा जीव घेतला होता.
गुन्हेगारांमध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याची पत्नीही सामील असून ती हल्ल्यापूर्वी सीरियात पळून गेली होती. तिचा पती अन् इस्लामिक स्टेटचा दहशतवादी हयात बाओमुद्दीनने सुपरमार्केटमध्ये हल्ला करून 4 जणांची हत्या केली होती.









