प्रतिनिधी /मडगाव
मडगावील आणि गोव्यातील एक ज्येष्ठ चार्टर्ड अकौंटंट रमाकांत कृष्णा वेर्लेकर यांचे काल शुकवारी सकाळी अल्प आजाराने मडगावातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
ते 83 वर्षाचे होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यावर मडगाव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे. समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेतले.
टेबल टेनिस खेळात ते निपूण होते आणि अनेक वर्षे विद्यालयात तसेच राज्य पातळीवर चॅम्पियन म्हणून त्यांनी नावलौकीक मिळवला होता. मडगाव क्रिकेट क्लबसाठी त्यानी अनेकदा क्रिकेट सामन्यात भाग घेतला होता.