बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने चामराजनगर घटनेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली आहे. दरम्यान, बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी.ए. पाटील यांची ३ मे रोजी ऑक्सिजन कमतरतेमुळे चामारजनगर जिल्हा रूग्णालयात २३ मृत्यूची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय कमिशन म्हणून नियुक्ती केली. आदेशानुसार एक सदस्यीय आयोग आपला अहवाल १ महिन्याच्या आत सादर करेल. कर्नाटकातील चामराजनगर जिल्हा रुग्णालयात ३ मे रोजी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २३ जणांचा मृत्यू झाला होता. पण राज्य सरकारने ऑक्सिजन कमतरतेमुळे ३ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे.
तत्पूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सदाशिवा एस. सुलतानपुरी यांनी मंगळवारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयात भेट दिली. न्यायाधीशांनी रुग्णालयाला भेट देऊन चामराजनगरचे जिल्हा आयुक्त एम. आर. रवी यांच्याशीही बोललो व रुग्णालयाच्या आवारातील परिस्थितीचा आढावा घेतला, असे ते म्हणाले.
दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता असल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारने दावा केला आहे की या कारणास्तव मृत्यूपैकी केवळ तीन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे.









