प्रतिकूल परिस्थितीशी झगडत कलेची जोपासना
प्रवीण जाधव / रत्नागिरी
प्रत्येक कलाकार आपल्या आविष्कारातून इतरांना आनंद देण्यासाठी धडपडत असतो. या धडपडीतून केवळ उत्पन्न हा हेतू नसतो तर नवनिर्मितीचे समाधान, मनापासून मिळणारी कौतुकाची थाप यासाठी तो आसूसलेला असतो. आपली कला जगभरात पोचावी अशी सुप्त इच्छाही त्याच्या मनात असतेच..!. संगमेश्वर-चाफवली येथील अमित कांबळे या धडपडय़ा तरुण कलाकाराला आपली कला सातासमुद्रापार पोचवण्यात यश मिळाले असून जगभरातून त्याच्या चित्रांना मोठी मागणी आह़े
मनावर अधिराज्य करणाऱया भावना कागदावर साकारणे, रेखाटणे त्यात रंग सजवणे जमू लागले की त्या कलाकृतीशी चित्रकाराचे एक नाते निर्माण होत़े त्या नात्यावर मनस्वी प्रेम आणि बांधिलकी यातून अनोखे आविष्कार जन्माला येतात. चित्रकलेशी असेच अतुट नाते जोडणारा अमित कांबळे हा मुळचा संगमेश्वर तालुक्यातील चाफवलीचा रहिवासी. त्याचे कुटुंब कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असून तेथे माळीकाम करून ते उदरनिर्वाह चालवतात़ मात्र मुलाची चित्रकलशी जोडलेली नाळ पाहून त्यांनी शक्य ते प्रोत्साहन त्याला दिले. प्रतिकूल परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता अमितनेही आपली कला जोपासण्यात कसूर ठेवली नाही.
अमितने 12 वी ला 71 टक्के गुण प्राप्त केले मात्र चित्रकलेतच करिअर करण्याच्या निश्चयाने मुंबईमधील प्रतिष्ठित ज़े जे. स्कूल ऑफ आर्ट येथे प्रवेश मिळवल़ा उपजत चित्रकलेची आवड असणाऱया अमितच्या कलेला खऱया अर्थाने आकार मिळू लागल़ा पदविका पूर्ण केल्यानंतर त्याने फाईन आर्ट्सची बीएफए पदवी प्राप्त केल़ी अमितच्या चित्रांची प्रदर्शने विविध ठिकाणी झाली व देशाच्या कानाकोपऱयातून त्याचे कौतुक झाल़े यातूनच त्याच्या चित्रांनी देशाच्या सीमा लिलया पार करत जगभर आपली ओळख पटवायला सुरुवात केली.
अमितची चित्रे लंडनसारख्या पुढारलेल्या भागात पोहोचू लागली आहेत़ अमित उत्तम व्यंगचित्रकारही आह़े महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे अमितचे आवडते व्यंगचित्रकार आहेत़ त्यांच्या चित्रांमधील फटकारे आपल्याला अधिक भावतात, असे अमित सांगत़ो महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली, गुजरात अशा विविध राज्यांतून अमितला चित्रे काढण्यासाठी बोलावण्यात येते.
भारतरत्न ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या विचाराचा अमितवर प्रभाव आह़े गौतम बुद्धांची विविध भावमुद्रा असणारी चित्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाला संविधान अर्पण करत असल्याचे चित्र ही याचीच उदाहरणे आहेत. मूळगाव चाफवली येथील बुद्धविहारातही अमितने आपल्या चित्रकलेचे दर्शन घडवले आह़े चाफवलीसारख्या खेडय़ातील तरूण जगभरात आपली कला पोहोचवत असल्याने सर्वत्र विशेष कौतुक ग्रामस्थांना आह़े
व्यंगचित्रकार राज ठाकरे हे माझे आदर्श
महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा माझ्यावर प्रभाव आह़े त्यांना मी गुरू मानत़ो त्यांच्या चित्रातील फटकारे मला अधिक भावतात़ भविष्यात एक उत्तम चित्रकार होण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहे.









