प्रतिनिधी /काणकोण

चापोली धरणाचा पिण्याच्या पाण्याबरोबरच मत्स्य उत्पादनासाठी देखील करता येतो या उद्देशाने मत्स्य पैदास खात्याने केलेल्या या प्रत्यनातून मागच्या आठवडय़ात 700 किलो इतके मासे पकडण्यात या विभागाला यश आले आहे. याचा ठेका पोळे येथील दीपक पागी यांनी स्वीकारला होता आणि त्यांना यात ‘कटला’ आणि ‘राहू’ जातीचे मासे आढळले होते.
गोडय़ा पाण्यातील माश्यांना गोव्यात विशेष असा भाव मिळत नाही. मात्र, याच माश्यांना कलकत्ता, कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यात विशेष भाव मिळत असल्याची माहिती दीपक पागी यानी दिली.
या पकडलेल्या माश्यांमध्ये चक्क 25 किलो वजनाचा एक मासा होता. यावेळी उपस्थित असलेल्या जलस्त्रोत खात्याच्या कनिष्ठ अभियंता कल्पना गावकर, मत्सोद्योग खात्याचे प्रतिनिधी लवकुश मळिक यांच्या उपस्थितीत हा लिलाव करण्यात आला.









