रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक, एक फरारी
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नरजवळ हॉटेल मिरची समोर रिक्षा आडवून रिक्षा चालकास आणि आतील प्रवाशास चाकूचा धाक दाखवत लुबाडल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल सुभाष घोडके (वय 22, रा. कुंकूवाली गल्ली, मंगळवार पेठ) यास अटक केली असून, त्याचा साथीदार फरार आहे. घोडके याला गुरूवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे








