रत्नागिरी/प्रतिनिधी
जे चाकरमानी कोकणात येण्यास इच्छुक आहेत त्यांना सुखरूप गावी आणण्यात येणार आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. याबाबत काही मंडळी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे कोणी याबाबत किमान राजकारण करू नका. रत्नागिरी ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामस्थ यांच्यात वाद घालून देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल अशी उदय सामंत यांनी दिली
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे कोरोनामुक्त झाले आहोत. तरीदेखील अद्यापही आपला धोका कमी झाला नाही. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त राहू नये अजून खबरदारी घेतली पाहिजे. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह 40 परिचारिका टीम उत्तम प्रकारे काम करत असल्याने आज आपला जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करतो असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस प्रशासनाने ही खूप चांगली कामगिरी केली आहे यामध्ये अगदी कॉन्स्टेबल पासून ते वरिष्ठ अधिकारी यांचे योगदान ही खूप मोठे आहे. आशा सेविका यांनीही घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे, त्यामुळे यामध्ये कशा पद्धतीने मुंबई पुण्यातुन चाकरमानी रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आणता येतील, त्यांनतर त्यांच्या तपासण्या, कोरोंटाईन याविषयी आम्ही नियोजन करत आहे यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र शासन जे आदेश देईल त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल. चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी रेल्वे, एसटी मदत घेण्याचा प्रयन्त आहे. यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे ही अंमलबजावणी यावेळी चाकरमान्यांना आणताना केली जाणार आहे. जिल्ह्यात कोणी सरकारी अधिकारी आपल्या नातेवाईकांना वगैरे गाडीतून आणत असेल तर संबंधित अधिकारी यांच्यावरही कारवाई केली जाईल.